ऊस दर न वाढवल्याने शेतकऱ्यांची सरकारवर नाराजी

रुडकी : साखर कारखान्यांचा निम्मा गळीत हंगाम संपल्यानंतर आता सरकारने ऊस दर जाहीर केला आहे. गेल्या वर्षीचा ऊस दर यंदा जसाच्या तसा लागू करण्यात आला आहे. दरवाढ केली नसल्याने उत्तराखंडमधील शेतकरी सरकारवर नाराज झाले आहेत.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हरिद्वारमधील लक्सर, इक्बालपूर, लिब्बरहेडीमध्ये खासगी क्षेत्रातील तीन कारखाने आहेत. येथे नोव्हेंबर २०२२ मध्ये नवा गळीत हंगाम सुरू झाला. ऊस दर निश्चित नसल्याने कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या ऊस दरानुसार शेतकऱ्यांना सामान्य प्रजातीसाठी ३४५ रुपये आणि प्रगत प्रजातीसाठी ३५५ रुपये प्रती क्विंटल ऊस दर दिला आहे. आता सरकारने ऊस दर तोच कायम ठेवण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा अन्याय असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here