बिजनौर: राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद कुमार बिट्टू यांच्या नेतृत्वाखाली बिलाई साखर कारखान्याच्या दर्गोपूर नंगली ऊस खरेदी केंद्राशी संबंधीत शेतकऱ्यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. कोणत्याही परिस्थितीत कारखान्याला यंदा ऊस पुरवठा करणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या दर्गोपूर नंगली येथील शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, आम्ही गेल्या अनेक वर्षापासून बिलाई साखर कारखान्याला ऊस विक्री करीत आहोत. मात्र, साखर कारखाना शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आम्ही बिलाई साखर कारखान्याला ऊस देऊ इच्छित नाही. त्याऐवजी दुसऱ्या साखर कारखान्याचे केंद्र बदलून द्यावे. याशिवाय शेतकऱ्यांनी ऊस खरेदी केंद्र व रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी केली. जिल्हाध्यक्ष विनोद कुमार, धीर सिंह, शूरवीर, नरेंद्र सिंह, चरण सिंह, लोकेंद्र सिंह, खिलेंद्र सिंह आदी निवेदन देताना उपस्थित होते.