फगवाडा : पंजाबच्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात आघाडी उघडली आहे. फगवाडा साखर कारखाना चौकाचे रुपांतर आता सिंधू बोर्डरमध्ये होताना दिसून येत आहे. साखर कारखान्यासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला ३१ जत्थेबंद्यांचे पाठबळ मिळाले आहे. फगवाडा साखर कारखाना चौकात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहिले आहे. आंदोलनाला पाठिंब्याबाबत फगवाडात बैठक सुरू आहे. यात २५ ऑगस्ट रोजी फगवाडा कारखाना चौकात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. साखर कारखाना प्रशासनावर दबाव वाढवावा, लवकरात लवकर पैसे दिले जावेत असा प्रयत्न आहे.
जागरणमध्ये प्रकाशीत वृत्तानुसार, शेतकरी नेत्यांनी सांगितले की, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल. याशिवाय लखिमपूर खिरी हत्याकांडात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी आवाज उठवला जाईल असेही यावेळी ठरले. शेतकरी नेते रुलदू सिंह मनसा, मनजीत सिंह राय, कुलदीप सिंह वाजिदपुर, फुरमान सिंह संधू, बलजीत सिंह, जंगबीर सिंह, मुकेश चंद्र शर्मा, बूटा सिंह बुर्जगिल, सतनाम सिंह अजनाला, रमिदर सिंह पटियाला, कुलवंत सिंह, अमरीक सिंह, बुद्ध सिंह आदींनी सांगितले की, फगवाडा कारखान्याकडे ७२ कोटी रुपये थकले आहेत. ते तातडीने दिले पाहिजेत.