शेतकऱ्यांना ऊस पिक लागवडीसाठी कारखान्यातर्फे प्रोत्साहन

बुरहानपूर : झिरीस्थित नवलसिंह सहकारी साखर कारखान्याद्वारे आपला कारखाना, आपले द्वार कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ऊस पिक लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यांना ऊस पिक लागवडीचे फायदे सांगितले जात आहेत. याअंतर्गत शाहपूर विभागातील चापोरा येथे विकास शिबिर घेण्यात आले. यामध्ये आमदार ठाकूर सुरेंद्र सिंह हे सहभागी झाले. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी केळी पिक व इतर पिकांसोबत एक ते दोन एकरमध्ये ऊस पिक लागवड करावी. ऊस शेती ही खूप फायदेशीर ठरणारी आहे.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मेळाव्यासाठी सदस्य ठाकूर आदित्य सिंह, ऊस पिक सल्लागार अशोक कुमार गुर्जर, खडकोद सूत गिरणीचे संचालक गोपाल महाजन, चापोरातील शेतकरी वासुदेवराव मोरे, रामदास कापसे, उपसरपंच रवींद्र नेरकर, मनोज पवार, चुडामण लांडे, माजी सरपंच डॉ. दीपक चापोरकर, दिवाकर गावंडे आणि दिलीप गावंडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here