शेतकरी भारताला स्वयंपूर्ण आणि अन्नधान्यचा मोठा उत्पादक बनवत आहेत- केंद्रय मंत्री पीयूष गोयल

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग आणि वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी भारताला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी कृषी उत्पादनांच्या उत्पादनात आणि दर्जामध्ये झालेल्या वाढीबद्दल आणि कृषी संबंधित उत्पादनांची निर्यात 50 अब्ज डॉलरच्या वर पोहोचल्याबद्दल देखील आनंद व्यक्त केला आहे. ते आज भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ(नाफेड) च्या सहकार्याने जागतिक डाळी महासंघाने आयोजित केलेल्या नाफेड- डाळी 2024 परिसंवादात बोलत होते.

भारताला स्वयंपूर्ण आणि अन्नधान्य, डाळी, मसूर, भाज्या, फळे यांचा मोठा उत्पादक देश बनवण्यात देत असलेल्या योगदानाबद्दल गोयल यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले की यामुळे विविध प्रकारच्या खाद्य उत्पादनांचा दर्जा आणि उत्पादनात वाढ होऊन भारत कृषी संबंधित उत्पादनांचा 50 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्याच्या कृषी उत्पादनांचा निर्यातदार बनला आहे. गेल्या एका दशकात शेतकऱ्यांची बांधिलकी आणि क्षमता यामुळे डाळींच्या उत्पादनात 60% वाढ झाली असून हे उत्पादन 2014 मधील 171 लाख टनांवरून 2024 मध्ये 270 लाख टनांवर पोहोचले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

“नाफेड आणि जीपीसीमधील भागीदारी वृद्धिंगत होत राहील आणि डाळींना केवळ भारताचेच अद्भुत खाद्य नव्हे तर जगाचे अद्भुत खाद्य बनवेल”, असे पीयूष गोयल म्हणाले.

भारत डाळ विषयी बोलताना मंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी आणि भारतीय नागरिकांना किफायतशीर दरात डाळी उपलब्ध करून देण्यासाठी भारत डाळ उपक्रम सुरू केला. सरकारने खरेदी केलेल्या चणा डाळीची भारत ब्रँड अंतर्गत किरकोळ विक्री सुरू केल्यावर विक्रीला सुरूवात झाल्यापासून केवळ चार महिन्यांच्या आतच मसूर चणा बाजाराचा 25 टक्के भाग या डाळीने व्यापला आहे, असे त्यांनी सांगितले. किमान हमी भावासंदर्भात(MSP) गोयल म्हणाले की आज आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष लागवडखर्चाच्या वर 50 टक्के दराची हमी एमएसपीमधून मिळत आहे आणि गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळत आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here