मायावतींनी उपस्थित केला ऊस थकबाकीचा मुद्दा; कमजोर मान्सूनचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी

लखनौ : चालू हंगामात कमकुवत मान्सूनचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) प्रमुख मायावती यांनी गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारकडे केली. त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील शेतकरी आधीच संकटात आहेत. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या ऊसाची थकबाकी आणि एफआरपी अद्याप कारखान्यांकडून त्यांना मिळालेली नाही.

बसपा प्रमुखांनी हिंदीमध्ये एक ट्विट करताना म्हटले आहे की, आपल्या शेतातील उत्पादनाचे लाभदायी मूल्य आणि ऊस थकबाकी मिळाली नसल्याने उत्तर प्रदेशातील शेतकरी आधीच खूप दुःखी आणि हवालदिल झाले आहेत. आता कमजोर मान्सूनने त्यांची चिंता आणखी वाढवली आहे. शेतकऱ्यांची स्थिती बिकट असल्याने सरकारने त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी तत्काळ मदत करण्याची गरज आहे. राज्यातील पिक सुरक्षा आणि साठवणुकीसाठी पुढील पाच वर्षात १९२ कोटी रुपयांचा खर्च करण्याची सरकारची घोषणा म्हणजे प्रती वर्षी फक्त ३८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. उत्तर प्रदेशासारख्या शेतकरी मोठ्या संख्येने असलेल्या राज्यासाठीची ही घोषणा म्हणजे उंटाला जीरे खायला देण्यासारखे आहे. अशी तुटपुंजी मदत करून सरकारने उपेक्षा करू नये अशी बसपाच्यावतीने मागणी करण्यात येत आहे, असे मायावतींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here