पाण्याअभावी ऊस वाळू लागल्याने शेतकरी चिंतेत

जालना : जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्‍यात ऊस पाण्याअभवी वाळू लागला आहे. हा ऊस कारखान्यांना घालण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मजुरांची टंचाई, कारखान्यांचे तोडणीचे कोलमडलेले वेळापत्रक, जादा पैसे मागणारी ऊसतोड यंत्रणा यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आता उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने नद्या, विहीर, बोअरवेलची पाणी पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे पाणी उपसा काही तासांवर आल्याने उसाच्या पिकाला आता पुरेसे पाणी देणे शक्‍य होत नाही.

जायकवाडी धरणाचा डावा कालवा, गोदावरी नदीवरील बॅरेजेस, लघुसिंचन तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, गोदावरी व दुधना नदीमुळे पाण्याची उपलब्धता असल्याने ऊस क्षेत्र वाढले आहे. दोन्ही तालुक्‍यात समर्थ, सागर या सहकारी साखर कारखान्यांबरोबर समृद्धी हा खाजगी तर ब्ल्यू सफायर फूड प्रोसेसिंग या गूळ पावडर कारखान्याबरोबर छोटे-मोठे गूळ युनिट आहेत. यंदा पर्जन्यमान अल्पशः प्रमाणात राहिल्याने सिंचन प्रकल्पात पाणी नाही. शेतकरी ऊस तोडणीसाठी साखर कारखानदारांचे उबरंठे झिजवत आहे. शेतकऱ्यांना ऊसतोड मजुरांची मनमानी सहन करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here