ऊसाचा वाढता उत्पादन खर्च आणि दरातील तफावतीमुळे शेतकरी चिंतेत

महराजगंज : साखर कारखान्यांमध्ये ऊसाच्या गाळपाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा सूर आहे. ऊस शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि सातत्याने दु्ष्काळाची स्थिती असल्याने यावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत ऊस दरवाढ झाली नाही तर स्थिती आणखी खराब होवू शकते. सध्या शेतकऱ्यांना सामान्य प्रजातीच्या वाणाला ३४० रुपये प्रती क्विंटल दर मिळतो. केंद्र सरकारकडून एफआरपीमध्ये १५ रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना एसएपीच्या दरवाढीची अपेक्षा आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आगामी गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील घुघली, फरेंदा, सिसवा, ठुठबारी विभागातील ४० हजार शेतकऱ्यांनी १५,९१८ हेक्टरमध्ये ऊस शेती केली आहे. बिहारी छपरा, राजपूर, भुवना, घुघली बुजुर्ग, मेदनीपुर, बरवा रतनपूर, बेलवा घाट, मिश्रौलिया, बहुआरा, डोमा, बढया, बजहा, मथुरानगर, लोहरपूरवा, महुआरी आदी गावांत महराजगंजच्या शेतकऱ्यांनी चांगला ऊस पिकवला आहे. मात्र, डिझेल दरवाढ आणि दुष्काळासारखी स्थिती असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हंगाम सुरू होणास दोन महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवर दरवाढीसाठी दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. सरकारने राज्य सल्लागार मूल्य (एसएपी) जाहीर केले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान, आगामी हंगामात एसएपीत दरवाढीमुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेल. डिझेलची दरवाढ आणि पाऊस कमी असल्याने यावेळी उसाचा उत्पादन खर्च वाढला आहे, असे जिल्हा ऊस अधिकारी ओमप्रकाश सिंह यादव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here