माळशिरस (पुणे) : पुन्हा झालेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी वर्ग घाबरला आहे. मोठ्या प्रमाणावर कांदा पिकावर सध्या खर्च करुन खरिपाप्रमाणे रब्बीतील पिकेदेखील वाया जातात की काय, अशी भीती शेतकर्यांना वाटू लागली आहे. ढगाळ हवामानामुळे कांदा गहू यांसारख्या पिकांवर रोग पडण्याची भीती शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीच्या नुकसानीच्या सरकारच्या मदतीची शेतकरी प्रतीक्षा करीत असताना परत एकदा निसर्गाची ही आपत्ती ओढावते की काय, अशी भिती निर्माण झाली आहे. मागील काही दिवसात पावसाने उघडीप दिल्यानंतर अद्याप शेत वाफसा होण्यास सुरुवात झाली होती. कांद्याच्या वाढलेल्या बाजार भावामुळे रोप उपलब्ध नसल्याने महागडे कांद्यांची रोपे घेवून शेतकर्यानी कांदा लागवड केली आहे.
पण पुन्हा हवामानात बदल होवून हवामान ढगाळ झाले आहे. अशा हवामानामुळे कांदा पिकावर रोगराई होण्याची भीतीदेखील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.