मुझफ्फरनगर : जिल्ह्यातील जमीन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेकडो ऊस उत्पादक शेतकरी करोडपती झाले आहेत. साखर कारखान्यांनी एका वर्षात शेतकर्यांकडून ३१०० कोटींहून अधिक रक्कमेच्या उसाची खरेदी केली आहे. इतर उद्योगांना विकलेल्या उसाच्या पेमेंटचा हिशेब वेगळा आहे. जिल्ह्यात २ लाख हेक्टर शेतजमीन आहे. एका अंदाजानुसार जिल्ह्यात १.६६ लाख हेक्टर जमिनीवर शेतकरी ऊस पिक घेतात. तथापि, २०२१–२२ मध्ये १.७३ लाख हेक्टर जमिनीवर उसाची पेरणी झाली. यावेळी १६०८ लाख क्विंटल उसाचे उत्पादन झाले. साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३१०० कोटी आणि क्रशरद्वारे सुमारे ५०० कोटी रुपये देण्यात आले.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस पिकवून शेतकरी श्रीमंत होत आहेत. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अनेक शेतकरी असे आहेत की, ज्यांना यावर्षी ऊस पिकासाठी १५ ते २० लाख रुपये मोबदला मिळाला आहे. अनेक शेतकरी वर्षानुवर्षे ऊसाची लागवड करत आहेत. यावर्षी टिटवी कारखाना परिसरातील जय भगवान यांच्या खात्यावर १९ लाखांहून अधिक रुपये मिळाले आहेत. लाडवा येथील शेतकरी संजय कुमार यांच्या खात्यात १८ लाखांहून अधिक, तर मन्सूरपूर साखर कारखाना परिसरातील धनयन गावातील शेतकरी राजबीर यांच्या खात्यात १७ लाख रुपये आहेत. तसेच रोहना साखर कारखाना परिसरातील घलोली गावातील शेतकरी ब्रह्मप्रकाश यांच्या खात्यात १७ लाखांचे ऊस बिल मिळाले आहे.