शेतकर्‍यांनी चार तासांसाठी केला एनएच 24 ब्लॉक, दिल्लीतून गाजियाबादकडे जाण्याचा मुख्य रस्ता बंद

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी दिल्ली मेरठ हाइवे एनएच 24 पूर्णपणे ब्लॉक केला. दरम्यान दिल्लीतून गाजियाबाद आणि मेरठकडे जाणार्‍या लोकांना असुविधा होवू शकते. शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे की, एनएच 24 ला चार तास 11 ते 3 वोपर्यंत बंद ठेवणार. एनएच 24 दिल्ली यूपी चा मेन हाइवे आहे. हाइवे च्या माध्यमातून दिल्लीतून गाजियाबाद, मेरठ, मुरादाबाद आणि उत्तराखंड जाता येते. आतापर्यंत शेतकर्‍यांनी एनएच 24 ची एकच बाजू बेंद केली होती पण आज भारत बंद मुळे दोन्हीकडून हा रस्ता ब्लाकॅ केला आहे. दरम्यान केवळ अ‍ॅम्ब्युलन्स आणि इमरजन्सी सेवांनाच इथून जाण्याची अनुमती आहे.

यापूर्वी पोलिसांनी शेतकर्‍यांची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला होता. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी लोकांना एनएच 24 पासून वाचण्यचा सल्ला दिला आहे. लोकोनी मार्ग बदलून आनंदविहार च्या रस्त्यावरुन यूपीला जाण्यासाठी सांगितले आहे. एनएच 24 वर ड्रोन कॅमेर्‍यातून निरीक्षण केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here