उद्या शेतकर्‍यांची भारत बंद ची हाक, हे राहणार सुरु, हे राहणार बंद

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून आणण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधारातील शेतकर्‍यांच्या आंदोलनाने आज 12 व्या दिवसात प्रवेश केला आहे. शेतकर्‍यांच्या समर्थनामध्ये पूर्ण विरोधी पक्ष एकत्र झाला आहे. अशामध्ये सरकारला शेतकरी नेत्यांमध्ये अनेक चर्चाही झाल्या, पण आतापर्यंत कोणताही परीणाम समोर आलेला नाही. तर, शेतकर्‍यांनी आंदोलना दरम्यान आठ डिसेंबर ला देशव्यापी भारत बंद ची घोषणा करण्यात आली आहे.

हरियाणा, पंजाब शिवाय उत्तर प्रदेश, दिल्ली, ओडिसा, उत्तराखंड, पश्‍चिम बंगाल, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तामिळानडू च्या शेतकर्‍यांनीही बंद चे समर्थन केले आहे. याशिवाय 10 ट्रेड यूनियनही बंद च्या समर्थनार्थ आली आहेत. दिल्ली सीमेवर असणार्‍या शेतकर्‍यांनी सांगितले की, आठ तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद राहिल. ट्र्रॅफिक जाम तीन वाजेपर्यंत राहिल. अशामध्ये आवश्यक सेवांचा पुरवठाही प्रभावित होवू शकतो. शेतकरी नेता राकेश टिकैत यांनी सांगितले आहे की, 11 वाजल्यापासून तीन वाजण्याच्या दरम्यान भारत बंद राहिल. यासाठी कार्यालयात जाणार्‍यांना 11 वाजण्यापूर्वी घरातून बाहेर जाणे आवश्यक आहे आणि चार वाजल्यानंतर घरी येणे आवश्यक आहे.
या सेवा बंद राहतील.
* हरियाणा, पंजाब, राजस्थान या तीन राज्यात सर्व बाजार बंद राहिल
* सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी तीन वाजेपर्यंत ट्रॅफीक जाम राहील
* वाहतुक सेवांवर परिणाम होवू शकतो. बस आणि रेल्वे तून प्रवास करणार्‍या प्रवाशांना त्रास होंवू शकतो

या सेवा सुरु राहतील.
* अ‍ॅम्ब्युलन्स आणि आपातकालीन सेवा
* मेडिकल स्टोअर
* रुग्णालये
* लग्नसोहळ्यावर प्रतिबंध नाही

दिल्ली मध्ये काही ऑ्रटो आणि टॅक्सी यूनियननी शेतकर्‍यांच्या भारत बंदला समर्थन दिले आहे. यामुळे शहरामध्ये प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इतर अनेक संघांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठीबां देण्याबराबेरच सेवा सामान्यपणे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here