कोरोना काळात ऊसावर वाढला शेतकऱ्यांचा विश्वास

मुझफ्फरनगर : कोरोनाच्या कालावधीत फुले आणि फळांची इतर राज्यांमध्ये पाठविण्यावर निर्बंध आले. विवाह समारंभ नसल्याने तसेच हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट आदी बंद असल्याने त्याची मागणीही वाढली नाही. शेतकऱ्यांना त्यापासून अपेक्षित फायदा झाला नाही. याऊलट शेतकऱ्यांना आपला ऊस साखर कारखान्यांना पाठविता आला. परिणामी यंदा शेतकऱ्यांचा ऊस पिकावर विश्वास वाठला आहे.

कोरोना काळात सर्वच घटकांना फटका बसला. शेतकरी, कामगार, व्यापारी, नोकरदार असे सर्व घटक हवालदिल झाले. फुळे, फळांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. या पिकांचा पुरवठा इतर राज्यात करता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षी तर शेतकऱ्यांनी या पिकावर ट्रॅक्टर चालवले. हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट बंद राहिल्याने तेथे भाजीपाला पाठवता आला नाही. लग्नासारखे कार्यक्रम नसल्याने शेतकऱ्यांकडील सजावटीसाठी लागणारी फुले पडून राहिली. या पिकांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले.

मात्र, कोरोना काळात ऊस शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली. साखर कारखाने, गुऱ्हाळघरे, क्रशर मे-जूनपर्यंत सुरू राहिले. शेतकऱ्यांचा गाळप योग्य ऊस कारखान्याला पाठवला गेला. कारखान्यांनी आतापर्यंत ८३ टक्के ऊस बिले दिली आहेत. गेल्या अनेक वर्षात ही सर्वाधिक आहेत. त्यामुळे शेतकरी आता ऊस पिकावर विश्वास ठेवत आहेत. जिल्ह्यात गेल्यावर्षी उसाचे क्षेत्र १.६४ लाख हेक्टर होते. यावर्षी त्यात दोन टक्क्यांपर्यंत वाढ होईल.

जिल्ह्यात ऊसाची रोपे तयार करण्यासाठी ११५ स्वयं सहाय्यता गट कार्यरत आहेत. त्यातून २५३३ महिलांना रोजगार मिळाला. या समुहांनी ५१९६१५० सीडलिग्ज वितरीत केले. ऊस विभागाने त्यांना ७७ लाख ५४ हजार २२५ रुपये अनुदान दिले आहे. दरम्यान, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी म्हणाले, जिल्ह्यातील कारखान्यांनी ८३ टक्के ऊस बिले दिली आहेत. उर्वरित पैसे देण्यासाठी कारखान्यांवर दबाव वाढवला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here