बिजनौर : ऊसाच्या ०२३८ या प्रजातीवर लाल सड रोगाचा हल्ला होऊनही शेतकऱ्यांनी या प्रजातीवर आपला विश्वास कायम ठेवला आहे. शेतकऱ्यांनी या प्रजातीची जोरदार लावण केली आहे.
जिल्ह्यात उसाचे २ लाख ४७ हजार ८६१ हेक्टर क्षेत्र आहे. यातील सुमारे ९८ टक्के क्षेत्रात उसाच्या ०२३८ या प्रजातीची लावण करण्यात आली. चालू गळीत हंगामात जिल्ह्यात या ऊसावर लाल सड रोगाचा जोरदार हल्ला झाला. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दुसऱ्या प्रजातीच्या उसाची लागवड करण्याचे आवाहन केले. तसेच लाल सड रोग हा उसासाठी कॅन्सर असल्याचा इशारा दिला. याचे उत्पादन कमी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रजातीची लावण केल्यास त्याचा सर्व्हे केला जाणार नाही.
त्यानंतरही शेतकऱ्यांनी जिल्ह्यात याच प्रजातीची लागण केली आहे. या जातीपासून उसाचे चांगले उत्पादन येत असल्याचा दावा शेतकऱ्यांचा आहे. जिल्ह्यात ९८ टक्के शेतकरी हाच ऊस लावतात. त्यामुळे बिजनौर जिल्हा ऊस गाळपात पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळपाचा उच्चांक मोडला आहे. धामपूर साखर कारखाना राज्यात गाळपामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी ०११८ या प्रजातीच्या उसाची लागण केली आहे. रोगापासून बचाव करण्यासाठी शेतकरी किटकनाशकाचा वापर अधिक करत आहेत. याबाबत शेतकरी अनिल चौधरी, निरंकार सिंह यांनी सांगितले की, ही उसाची जात अतिशय चांगली आहे. त्यापासून अधिक उत्पादन मिळत असल्याने त्याची लागवड अधिक केली जाते.