पंजाब : कित्येक राज्यांमधून जे ऊस तोड मजूर नांव्हेंबर मध्ये इथे आले होते आणि एप्रिलपर्यंत जाणार होते, आता लॉकडाउन मुळे इथे अडकले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मजूर आपल्या गावाकडे परत आले नाहीत, आणि त्यांना आता गावाला परत जायचे आहे. जर हे मजूर आपल्या गावाकडे गेले, तर पुन्हा परत येण्याची शक्यता कमी आहे. यासाठी स्थानिक शेतकर्यांचे आता तांदळाच्या हंगामाकडे लक्ष आहे. यामुळे ऊस मजुरांना गावी परत जावू नका… अशी विनंती शेतकरी करत आहेत.
स्थानिक शेतकरी कुलवंत सिंह यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या 15 मजुरांना परत न जाण्यासाठी मनवले होते. यापूर्वी, तेदेखील जाणार होते आणि त्यासाठी श्रमिक रेल्वे मध्ये नोंदणीकरण्यासाठी देखील त्यांनी आमच्याकडे संपर्क केला, पण आतापर्यंत कोणताही संदेश मिळालेला नाही. यासाठी त्यांनी पुन्हा इथेच काम सुरु करण्याचे ठरवले. शेतकरी सुखवंत सिंह म्हणाले, ऊस मजूरांनी निदान या हंगामापर्यंत तरी इथे रहावे. मजुरांची कमी ही शेतकर्यांसाठी खूप कठीण गोष्ट आहे. त्यामुळेच मजूर जर इथे राहिलें तर या हंगामात कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.