इथेनॉल उत्पादन अभ्यासासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ जाणार ब्राझील दौऱ्यावर

बेंगळुरू : इथेनॉल उत्पादन आणि त्याच्या वापराचा उपयोग याचा अभ्यास करण्यासाठी आणि सरकारला अहवाल सादर करण्यासाठी विविध राज्यांतील ऊस उत्पादक शेतकरी संघटनांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ लवकरच ब्राझील दौऱ्यावर जाणार आहे. शिष्टमंडळात उद्योगांचे प्रतिनिधी आणि सरकारी अधिकारीही सहभागी असतील. हे शिष्टमंडळ लवकरच जाईल अशी अपेक्षा आहे. Karnataka Sugarcane Cultivators Association चे अध्यक्ष कुरबुर शांता कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी नेतेही या शिष्टमंडळाचा भाग असतील.

द हिंदूमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शांता कुमार म्हणाले की, सरकारकडे आम्ही वारंवार इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी इथेनॉल उत्पादन धोरण तयार करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, आम्ही २००६ मध्ये एक शेतकरी परिषदेचे आयोजन केले होते. आणि याबाबत मागणी मांडली होती. सरकार आता या दिशेने प्रयत्न करीत आहे. ते म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून साखर कारखानदारांकडून थकबाकी न मिळाल्याने शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या आर्थिक संकटात इथेनॉल उत्पादनातील वाढ हाच पर्याय आहे. ते म्हणाले की, पेट्रोलियम पदार्थांसोबत इथेनॉल मिश्रण करणे पर्यावरणपूरक ठरेल. शिवाय, यातून पेट्रोलियम आयात घटून देशाच्या परकीय चलनात बचत होणार आहे. शेतकऱ्यांचा हा दौरा गेल्या वर्षी जारी भारतातील इथेनॉल मिश्रण रोडमॅपसाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण, अहवालानुसार २०२५ पर्यंत इथेनॉल मिश्रण २० टक्के होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here