हरियाणात ऊस दर वाढवण्याची उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

कर्नाल : ऊस प्रजनन संस्थेने आयोजित केलेल्या ऊस उत्सव २०२२ मध्ये हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांतील २,५०० प्रगतशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्यासोबत संबंधीत साखर कारखान्यांचे ऊस विकास अधिकारीही उपस्थित होते. कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनास प्रमुख पाहूणे खासदार संजय भाटिया, महापौर रेणू बाला गुप्ता उपस्थित होत्या. यावेळी शेतकऱ्यांनी ऊस दरवाढीची मागणी केली. खासदार भाटिया यांनी राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी कार्यरत आहे. आताही त्यांना निराश केले जाणार नाही असे आश्वासन दिले. मी ऊस दरवाढीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. ही वाढ पंजाबपेक्षा अधिक असेल असा दावा भाटिया यांनी केला.

या कार्यक्रमात ऊसाच्या नव्या CO-१५०२३ या प्रजातीचे सादरीकरण करण्यात आले. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना या उसाच्या नव्या वाणाची माहिती दिली. विभागीय केंद्रप्रमुख डॉ. एस. के. पांडे यांनी केंद्रात सुरू असलेल्या ऊस विकास कार्यक्रम व संशोधनाच्या कामाची माहिती दिली. उसाच्या सीओ ०२३८ या प्रजातीबाबतही माहिती दिली. शेतकऱ्यांनी या प्रजातीवर टॉप बोरर किडीचा फैलाव होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. डॉ. पांडे यांनी किड व्यवस्थापनाच्या मुद्यावर भर दिला. किटकनाशकांचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले. वाणिज्य संचालक रमेश दत्त यांनीही शेतकऱ्यांना उसात टॉप बोरर किड रोखण्याच्या उपायांची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here