धामपूर: भारतीय किसान युनियनच्या तोमर गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन उप जिल्हाधिकारी धीरेंद्र सिंह यांना दिले. ऊसाला प्रती क्विंटल ५०० रुपये दर देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याच्या ऊस दर मूल्यांकन समितीची बैठक आयोजित करावी. ऊस दर ५०० रुपये क्विंटल करावा. शेतकऱ्यांना चौदा दिवसांत बिले द्यावीत. मूल्यांकन समितीत भाकियूच्या तोमर गटाच्या एका सदस्याचा समावेश करावा. केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, वीज दर कमी करावा, विंधनविहिरींवर मीटर लावू नयेत, शेतकऱ्यांना ३० रुपये प्रती लिटर दराने डिझेल द्यावे, घरगुती गॅसचा दर कमी करावा, कोरोनामुळे मुलांच्या शाळा, कॉलेजांची फी माफ करावी अशा मागण्यात केल्या आहेत.
निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये हिमांशू, गगनदीप चौहान, महीपाल सिंह, प्रशांत राजपूत, विभाग अध्यक्ष मानवेंद्र सिंह राजपूत उपस्थित होते. उप जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवू असे आश्वासन दिले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link