हाटा : नेहमीपेक्षा अधिक उष्णतेमुळे यावेळी ऊस पिकावर मोठा परिणाम झाला आहे. ऊसाची पाने वाळू लागली आहेत. सिंचनाच्या पर्यायी साधनांचा वापर केला जात असल्याने शेतीचा खर्च वाढत आहे. त्यानंतरही पिके वाळू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकरी पाने वाळू लागल्याने हवालदिल झाले आहेत.
अमर उजालामधील वृत्तानुसार, अहिरौली विभागातील लक्षीराय गावातील शेतकरी जवाहिर विश्वकर्मा यांनी सांगितले की, यावेळी तापमान खूप वाढल्याने पाने वाळत आहेत. ऊस वाळून जाईल अशी शक्यता वाटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा प्रकारे उन्हामुळे कधीच पिकाचे नुकसान झाले नव्हते.
शेतकरी छेदी सिंह यांनी सांगितले की, ऊस वाळू लागल्याने शेतकरी पर्यायी साधनांचा वापर करीत आहेत. मात्र, त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. आमचे पिक नष्ट होईल अशी भीती सतावत आहे. बाबू गेंदा सिंह ऊस संशोधन संस्था सेवरहीचे प्रमुख किटक शास्त्रज्ञ डॉ. विनय कुमार मिश्रा म्हणाले की, तापमानाचा परिणाम ऊस पिकावर झाला आहे. पाऊस झाल्यानंतर पिकामध्ये सुधारणा होईल. ऊसाचे २३८, को ९८०१४ ही प्रजाती तापमानामुळे अधिक प्रभावित झाली आहे.