मंड्या : पांडवपुरा येथील सहकारीसाखर कारखाना सुरु करण्याच्या हालचालीमुळे ऊस शेतकर्यांच्यात आनंदाची लहर उसळली आहे. पांडवपुरा कारखाना संचालनाची जबाबदारी भाजप नेते आणि माजी मंत्री मुरगेश निराणी यांच्याकडे सोपवली आहे. जिल्हाधिकारी एम.वी. व्यंकटेश यांनी हा साखर कारखाना निराणी यांना 40 वर्षॉसाठी लिजवर दिला आहे. साखर कारखाना सुरु झाल्यावर श्रीरंगपट्टण, पांडवपुरा आणि केआरपेट तहसील मधील ऊस उत्पादक शेतकर्यांना ऊस विक्री मध्ये येणार्या समस्या दूर होतील. शेतकर्यांचे म्हणणे आहे की, कारखाना सुरु झाल्यावर पुन्हा एकदा आशा वाटत आहे. कारखान्यामध्ये एक़ा दिवसात 3500 टन ऊस गाळप केले जावू शकेल. कारखाना 36 एकरात उभा आहे. कारखाना बंद झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांना ऊस गुर्हाळघरांना अतिशय कमी दरात विकावा लागत होता. कारखान्याचे नवे मालक भाजपा नेते व माजी मंत्री मुरगेश निराणी यांनी एका आठवड्यापूर्वी कारखान्याचा दौरा केला आहे. त्यांनी तीन महिन्यामध्ये कारखाना सुरु होईल अशी ग्वाही दिली आहे.
याावेळी पांडवपुरा येथील आमदार सी.एच. पुटराजू म्हणाले, पांडवपुरा तहसीलमध्ये साखर कारखाना सुरु होण्यास काहीच हरकत नाही. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या समस्या ऐकण्याबरोबरच शेतकर्यांना विश्वासात घेवून काम करावे लागेल.
मंत्री नारायण गौडा म्हणाले, पांडवपुरा तहसील मध्ये बंद पडलेला साखर कारखाना सुरु झाल्याने शेतकर्यांच्या समस्या दूर होतील. कित्येक वर्षांपासून शेतकरी कारखाना सुरु करण्याची मागणी करत होते.
आम. सुरेश गौडा म्हणाले, पांडवपुरा साखर कारखाना सुरु झाल्यानंतर शेतकरी आनंदाने जगतील. मुरगेश निराणी यांच्याकडे कारखाना सुपुर्द करण्यास काही हरकत नाही.
चनरायणपट्टणा येथील आम. बालकृष्णा म्हणाले, पांडवपुरा तालुक्यामध्ये कारखाना सुरु झाल्याने कमी पैशात ऊस विकणार्या शेतकर्यांना मोठी मदत होईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.