रासायनिक खतांमुळे जमिनीची उत्पादकता कमी होते त्यामुळे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी आपल्या जमिनीला पुन्हा पिकावू बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतर शेतकऱ्यांनाही सेंद्रीय शेतीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील दोन भावांनी शेतकऱ्यांमध्ये सेंद्रीय शेतीबाबत जागृती करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नांद्रा गावातील शेतकरी कृष्णकांत पाटीदार आणि त्यांचा भाऊ दिलीप यांनी पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांच्या कृषी पद्धतीनुसार जैविक शेती सुरू केली आहे. चार वर्षांपूर्वी ते रासायनिक खते आणि किटकनाशकांचा वापर पिकांवर करीत होते. मात्र, आता सेंद्रीय शेतीच्या पद्धतीनुसार गायीचे शेण, गोमुत्र, पीठ, जीवामृत आदींचा वापर केला जात आहे. त्यातुन गेल्या दोन वर्षात जमिनीची ताकदही वाढली आहे. यावर्षी त्यांनी ४० एकर जमिनीपैकी २० एकरमध्ये ऊस, ८ एकरमध्ये गव्हासोबतच मक्का, हळदीची शेतीही सेंद्रीय पद्धतीने केली आहे. दिलीप पाटीदार यांनी सांगितले की, आठ एकरातील गव्हाचे उत्पादन प्रती एकर १० ते १२ क्विंटल होते. आरोग्यासाठी ते हितकारक आहे. जैविक गुळ आणि हळदीलाही अधिक मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेशपर्यंत नांद्रा येथील गुळाला मागणी आहे असे पाटीदार यांनी सांगितले. जैविक गुळाला ६० रुपये दर मिळतो तर साध्या गुळाला ४० ते ५० रुपये दर आहे. एक डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत गुळाचे उत्पादन घेतले जाते. अडीच महिन्यात ४०० क्विंटल गुळ उत्पादन होते, असे सांगण्यात आले.