कासगंज: न्यौली साखर कारखान्यामध्ये गाळप सुरु झाले आहे. पण यावेळी गेल्या वर्षाच्या तुलनेत गाळपाचे लक्ष्य वाढवण्यात आले आहे. यावेळी साखर कारखाना 25 लाख क्विंटल उसाचे गाळप करेल. 16 लाख क्विंटल उसाची खरेदी जिल्ह्याच्या उस शेतकर्यांकडून करण्यात येणार आहे. तर 9 लाख क्विंटल उसाची खरेदी अलीगढ आणि बदायूं येथील शेतकर्यांकडून करण्यात येईल. अलीगढ चा साखर कारखाना बंद झाल्यामुळे हे लक्ष्य वाढवले आहे. लक्ष्य वाढल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांनाही अचडणी येणार नाहीत. त्यांच्या पूर्ण उसाचा वापर होईल तिथेच अलीगढ आणि बदायूं येथील शेतकर्यांनाही दिलासा मिळेल.
शासनाने यासाठी व्यवस्था निश्चित केली आहे. अलीगढ च्या शेतकर्यांकडून 3 लाख क्विंटल उस खरेदी केला चाईल. आणि बदायूं च्या शेतकर्यांकडून 6 लाख क्विंटल उस खरेदी केला जाईल. यासाठी 14 ख़ेरदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या खरेदी केंद्रांच्या माध्यमातून उस घेतला जाईल. जिल्ह्यातील शेतकर्यांनी आपला उस खेरीद केंद्रांवर पोचवणे सुरु केले आहे. एक दिवसापूर्वी शुक्रवारपासून असाची खरेदी सुरु करण्यात आली आहे. बदायूं आणि अलीगढ जिल्ह्यातील क्रय केंद्रही सक्रीय केले जात आहेत. अलीगढ आणि बदायूं जनपद येथील काही क्षेत्रातील उस खरेदी केला जाईल. हेदखील लक्षात टेवले आहे की, जिल्ह्यातील शेतकर्यांना अडचणी येवू नयेत. यासाठी 16 लाख क्विंटल उस जिल्ह्यातील शेतकर्यांकडून खरेदी केला जाईल.