कोल्हापूर, ता. 18 : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील ऊस अजून अपरिपक्व आहे. या ऊसाचा उतारा 8.5 ते 9 % पर्यंतच आहे. त्यामुळे हा उतारा शेतकऱ्यांना घातक ठरू शकतो. उतारा वाढल्यानंतरच ऊस तोड करू द्यावी असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी केले आहे.
प्रा. पाटील म्हणाले, जिल्ह्यात डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना सुरू आहे. या कारखान्याचा सध्याचा साखर उतारा 8.5 ते 9 % आहे. कमी उतारा असताना ऊस तोड करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हाच उतारा पुढील वर्षी ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे यावर्षी तरी नुकसान आहेच पण पुढील वर्षीही शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यानी ऊस तोड करण्याची घाई करू नये. असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.