मंगळवेढा : ऊसाची पहिली उचल २,५०० रुपये आणि अंतिम बिल ३,१०० रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा तालुक्यातील माचनूरमध्ये निदर्शने करण्यात आली. विविध प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे.
या आंदोलनामुळे या महामार्गावरील वाहतूक खूप काळासाठी विस्कळीत झाली. पश्चिम महाराष्ट्रातील स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष राहुल घुले यांनी सांगितले की, ऊस उत्पादकांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून एकजूट होण्याची गरज आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीमुळे विरोध केला नाही. त्यामुळे साखर कारखानदारांनी सांगली आणि कोल्हापूरच्या तुलेत एक हजार रुपये कमी ऊस दर दिला आहे. आंदोलनादरम्यान, पोलिस निरीक्षक माने यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.