हिंगोली : विभागातील साखर कारखान्यांनी मार्चपर्यंत साडेसात लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. आता मार्च महिना सुरू झाला. विभागातील टोकाई सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. परंतु अद्याप कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस तुटला गेला नाही.या भागातील ऊस बाहेरील कारखान्यांना देण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. कारखाने अद्याप किती दिवस चालणार? हे स्पष्ट नाही. त्यामुळे ऊस नेता कोणी ऊस’, असे शेतकरी म्हणू लागले आहेत.
पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे नियोजनबद्ध गाळप सुरु आहे. कार्यक्षेत्रात दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे शिल्लक आहे. पूर्णा सहकारी साखर कारखाना, कोपेश्वर साखर कारखाना तसेच टोकाई या कारखान्यांनी मार्च महिन्यापर्यंत साडेसात लाख मेट्रिक टन गाळप केले आहे. सध्या तिन्ही कारखाना कार्यक्षेत्रात दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा शिल्लक आहे. पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ७ मार्चपर्यंत ३ लाख ४५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. मात्र मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक असल्याने शेतकरी गाळपाच्या प्रतीक्षेत आहेत.