मध्यप्रदेशात साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यांची एकजूट

भोपाळ : मुरैना जिल्ह्यात जवळपास दशकभरापासून बंद असलेल्या सर्वाज जुन्या सहकारी साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शेकडो शेतकरी एकवटले आहेत. राज्यातील नोकरशाहीने कारखान्याची मशीनरी भंगारात विक्री काढली असताना शेतकऱ्यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या युनिटचे पुनरुज्जीवन करण्याचे संकेत दिले आहेत. स्थानिक शेतकरी आणि राजकीय नेत्यांनी म्हणणे मांडूनही मुरैनामध्ये कैलारसच्या प्लांट अँड मशीनरी ऑफ को -ऑपरेशन डिपार्टमेंट शुगर मिलच्या विक्रीसाठी एक निविदा जानेवारीमध्ये सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभागाकडून (PAM) जारी केली होती. या कारखान्यावर १०,००० शेतकरी आणि त्यांचे कुटुंब अवलंबून असल्याचा दावा शेतकरी आणि राजकीय नेत्यांनी केला आहे. हा कारखाना १९७३ मध्ये स्थापन करण्यात आला होता.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी आणखी एक संधी देण्यास सहमती दर्शविल्याचे सांगितले जाते. त्यांनी निविदा प्रक्रिया थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. सहकारी समित्यांचे मंत्री अरविंद भदौरीया, मत्स्य मंत्री तुलसी सिलावट, पीडब्ल्यूडी मंत्री गोपाल भार्गव यांनी याचे स्वागत केले. २०१९ मध्ये केंद्रीय मंत्री जोतिरादित्य सिंधीया हे एआयसीसीचे महासचिव असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजप काळात बंद पडलेल्या कारखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. सिंधीया यांनी तत्कालीन राज्य सरकारला आपली २९ कोटी रुपयांची थकबाकी देण्याबाबत, कारखाना प्रशासनाला अनुदान देण्याबाबत सल्ला दिला होता. त्यानंतर कारखाना सार्वजनिक-खासगी भागिदारी अथवा सहकारी रुपात चालवता येऊ शकतो असे सुचविण्यात आले होते. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजने केंद्र सरकारच्या नव्या इथेनॉल धोरणाकडेलक्ष देत कारखान्याच्या पुनरुज्जीवनात रस दाखवला आहे. ७२ वर्षीय एम. डी. पाराशर हे कारखान्याचे माजी मुख्य महाप्रबंधक आहेत. पाराशर यांनी लिहिलेल्या पत्रात महासंघाने तीन पर्याय सुचवले आहेत. उसाच्या रसाचे इथेनॉलमध्ये रुपांतर, साखर आणि स्थानिक धान्यापासून इथेनॉल यांचा यात समावेश आहे. फेडरेशनने कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here