शेतकऱ्यांनी की पाण्यामध्ये चांगले पिक उत्पादनासाठी केंद्र सरकारला चांगले सहकार्य केले आहे, असे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले. या दिशेने काम करताना स्मार्ट आणि सुक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे आज ऊस आणि भात अशी पिके कमी पाण्यात घेण्यात येत आहेत. हरियाणाने या दिशेने काम करताना चांगले यश मिळवले आहे. महाराष्ट्रातही सुक्ष्म सिंचन पद्धती विकसित करण्यात मदत मिळाली आहे, असे मंत्री शेखावत यांनी सांगितले.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, लोकसभेत कृषी निर्यातीबाबत खासदारांनी एक प्रश्न उपस्थित केला होता. ऊस, तांदूळ, साखर निर्यात केली जात आहे. या जादा पाणी घेणाऱ्या पिकांच्या माध्यमातून पाण्याचीही व्हर्च्युअली निर्यात केली जात आहे. भारतासारख्या कमी पाणी असलेल्या देशासाठी ही बाब चितेंची आहे, अशी विचारणा करण्यात आली होती. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शेखावत यांनी सांगितले की, कृषी क्षेत्रात पाण्याचा वापर कमी व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. स्मार्ट मायक्रो इरिेगेशन सिस्टिम वापरली जात आहे. यातून शेती क्षेत्रात २० टक्के पाण्याची बचत झाली आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांनी यासाठी विशेष काम केले आहे.