धौरहरा/ईसानगर (उत्तर प्रदेश): गेल्या वर्षीची थकबाकी न भागवल्याने नाराज झालेल्या शेतकर्यांनी रविवारी निदर्शने केली. त्यानंतर ऐरा साखर कारखान्याच्या खरेदी गेटला कुलूप लावले आणि टाळेबंदी केली. संध्याकाळी उशिरापर्यंत शेतकरी कारखाना गेटवर आंदोलन करत होते.
एकीकडे जिथे नव्या कृषी कायद्यांविरोदात दिल्लीमध्ये शेतकर्यांची निदर्शने सुरु आहेत तिथेच रविवारी धौरहरा क्षेत्रातील एकमेव साखर कारखान्यावर अरबो रुपये देय आहेत. ते पैसे भागवले जावेत या मागणीसाठी शेकडो शेतकर्यांनी कारखाना खरेदी गेटवर टाळेबंदी करुन उसाचे वजन बंद केले आहे.
शेतकर्यांनी सांगितले की, गेल्या 2019-20 च्या गाळप हंगामाचे गोविंद शुगर कारखाना ऐरा वर जवळपास दीड अरब करोड रुपये देय आहेत. हे निश्चित झाले होते की, सर्व साखर कारखाने उस खरेदीच्या दोन आठवड्यानंतर पैसे भागवतील. पण ऐरा साखर कारखान्याने पैसे भागवले नाहीत.