किसान साखर कारखान्यातर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सुल्तानपूर : किसान सहकारी साखर कारखान्यात १८ ते २७ सप्टेंबर या कालावधीत समिती स्तरीय सर्वेक्षण व तोडणी पावती प्रात्यक्षिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात येत आहेत. सोमवारी झालेल्या मेळाव्यात एकूण पाच तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी एकाची निर्गत लावण्यात आली. उर्वरित चार तक्रारी निर्णयासाठी वरिष्ठ ऊस विकास अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्या आहेत.

‘लाईव्ह हिंदूस्थान’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार,  दोन तक्रारींचा निर्णय होवू शकला नाही. याबाबत साखर कारखान्याचे व्यवस्थापक प्रताप नारायण म्हणाले की, शेतकऱ्यांच्या ऊस विषयक समस्या मेळाव्यात सोडविण्यात येत आहेत. मुख्य ऊस अधिकारी राधेश्याम पासवान यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकरी ३० सप्टेंबरपर्यंत नव्याने सभासद नोंदणी करू शकतात. दरम्यान, शेतकरी उत्पन्न वाढीसाठी अर्जासोबत विहित शुल्कही जमा करू शकतात. यावेळी साखर कारखाना असोसिएशनचे सरचिटणीस अवधेश सिंग, शेतकरी राम अनुज सिंग, कृष्णदेव त्रिपाठी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here