पारनेर सहकारी साखर करण्याचा ताबा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बैठका

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याचा ताबा घेण्यासाठी शेतकरी, सभासदांच्या बैठक सुरु झाल्या आहेत. कारखान्याच्या जमिनीचा निकाल नुकताच सभासदांच्या बाजूने लागला आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना बचाव समितीतर्फे कार्यक्षेत्रात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याप्रश्नी मांडवे खुर्द परिसरात कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. या बैठकीला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याविषयीचे विविध खटले सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल आहेत. त्याची माहिती रामदास घावटे यांनी बैठकीत दिली. पारनेर कारखान्याचे २० हजार सभासद असून त्यांचे सभासदत्व जिवंत होणार असल्याची माहिती बबनराव सालके यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here