गोला गोकर्णनाथ : साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये ऊस लागवड करताना ट्रेंच पद्धत वापरण्याविषयी जनजागृती करण्याची मोहिम सुरू ठेवली आहे. या पद्धतीमधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बजाज साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी पहाडपूर गावातील प्रगतीशील शेतकरी कुलवंत सिंह यांच्या शेताला भेट दिली. यावेळी साखर कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक (ऊस) पी. एस. चतुर्वेदी, ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक आशुतोष मधुकर, वरिष्ठ ऊस व्यवस्थापक संजीव कुमार सिरोही यांच्यासह विभागातील तीस शेतकरी उपस्थित होते.
या शेतकरी मेळाव्यात जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. शेतकरी कुलवंत सिंह यांनी सांगतिले की, ऊस पिकाबरोबरच वाटाणा पिकातून ४० ते ४५ हजार रुपये प्रती एकर आणि तोरिया पिकातून जवळपास ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. शेतामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग, किड नाही. गोला साखर कारखान्याने खते, बियाणे, किटकनाशके अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ट्रेंच पद्धतीचा वापर करून कमीत कमी चार फूट अंतर सरीमध्ये सोडावे असे आवाहन करण्यात आले.