बिहारमधील कोसी-सीमेवरील विभागातील शेतकरी आता मक्क्याच्या शेतीपासून दूर जात आहेत. हवामान बदल आणि वाढत्या शेती खर्चामुळे शेतकऱ्यांना आता मक्क्यापासून नफा होत आहे. मक्क्यापासून अनेक उत्पादने तयार केली जातात. मात्र, त्यानंतरही शेतकरी या पिकापासून दूरावत आहेत. कारण, बिहारमधील मक्का बाजार स्वतःला सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे.
टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, धान्य व्यापारी संघाचे अध्यक्ष पप्पू यादव यांनी सांगितले की, निर्यातदारांना चांगल्या प्रतीच्या धान्याची गरज आहे. जर त्यांना चांगल्या गुणवत्तेचे धान्य मिळाले नाही, तर ते दुसरीकडून मागणी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नाही. त्यामुळे गहू, भात पिक घेण्यासाठी ते मक्का शेतीपासून दूर जात आहेत. राज्यात आठ जुलैपर्यंत फक्त ३१.८४ लाख हेक्टरमध्ये मक्का पिक घेतले गेले. तर गेल्यावर्षी समान कालावधीत हे पिक ४१.६३ लाख हेक्टरमध्ये घेण्यात आले होते. यंदा २३ टक्के पिकात घसरण झाली आहे. दरम्यान, बिहारच्या पूर्वोत्तर भागात अररिया, मधेपुरा, सहरसा, सुपौल, पूर्णिया, किशनगंज आणि कटिहार या सात जिल्ह्यांचा समावेश होतो. पूर्णियातील गुलाब बाग मंडई हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मक्क्याचे व्यापार केंद्र आहे. भारतातून नेपाळसह शेजारी देशांना मक्का निर्यात केला जातो. मात्र, या भागातील शेतकऱ्यांसमोर मक्का पिकाची चोरी ही मोठी समस्या आहे.