देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. काही योजना त्यांना थेट आर्थिक लाभ देणाऱ्या आहेत. मोफत आणि स्वस्त रेशन, घर योजना, आरोग्य योजना आदीही राबविल्या जात आहेत. या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दर चार महिन्यांनी २००० रुपये दिले जातात. म्हणजेच तीन समान हप्त्यांमध्ये त्यांना १२,००० रुपयांचा लाभ दिला जातो. आतापर्यंत १२ हप्ते देण्यात आले आहेत. मात्र, पुढील १३ वा हप्ता देण्यापूर्वी महत्त्वाची प्रक्रिया शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई – केवायसी महत्त्वाची आहे. सरकारने ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे. मात्र, त्यांच्यासाठी ठराविक मुदतही दिली आहे. ई केवायसी प्रक्रिया सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून करणे अपेक्षित आहे. पोर्टलवर ओटीपी बेस्ड केवायसी तुम्ही स्वतः करू शकता. अन्यथा तुमच्या जवळील सुविधा केंद्रावर बायोमेट्रिक ई-केवायसी करण्याचा पर्याय खुला आहे. जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तर pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावून तो पर्याय निवडा. मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील हप्ता मिळण्यात अडथळा येऊ शकतो.