ऊसाला दर वाढवून मिळावा यासाठी शेतकरी संघटना झाल्या एकत्र, करणार मोठे आंदोलन

यमुनानगर: हरियाणामध्ये यावर्षी देखील ऊसाच्या किंमती वाढवल्या नसल्यामुळे सरकारी निर्णयाविरोधात राज्यातील शेतकर्‍यांनी आता शांत राहण्यास नकार दिला आहे. राज्यातील विविध भागात अनेक आंदोलने केल्यानंतर सुद्धा सरकारकडून याबाबत कसलेही आश्‍वासन मिळाले नसल्यामुळे शेतकर्‍यांनी ऊसाला चांगला दर मिळावा या मागणीसाठी मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

याबाबत राज्यातील शेतकर्‍यांचा संताप वाढत आहे. या संतापामुळे भारतीय शेतकरी संघटना आणि भारतीय शेतकरी युनियन यांना एकाच व्यासपीठावर आणले आहे. या दोन्ही संघटनांनी शेतकर्‍यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करुन नव्या वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघटना 1 जानेवारीला येथील सरस्वती साखर कारखान्याच्या ऊस यार्ड मध्ये ही बैठक घेतील , तसेच 5 जानेवारीपर्यंत शेतकर्‍यांची एकजूट करण्यासाठी अभियान चालवले जाईल. याबाबत दोन्ही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी शेतकरी भवनात बैठक घेवून आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यावर चर्चा केली.

ऊसाच्या किंमती वाढवण्याच्या मागणीवर शेतकरी संघाने कृषी मंत्र्यांना ज्ञापन देण्याशिवाय गेल्या आठवड्यात करनाल मध्ये सरकारविरोधात रोष रॅली काढली तथा सीएम कार्यालयाच्या समोर ऊसाची होळीही केली होती. संघटनेने सरकारला 3 दिवसांची वेळ देवून इशारा दिली की, जर या दरम्यान सरकारने ऊसाच्या किमंतीना घेवून शेतकर्‍यांबरोबर चर्चा केली नाही तर मोठे आंदोलन केले जाईल. 1 ते 5 पर्यंत व्यापक जन संपर्क अभियान चालवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. शेतकरी यूनियनने सांगितले की, शेतकर्‍यांचे हित पाहता या आंदोलनात शेतकरी संघाने हात मिळवला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here