कोल्हापूर : गळीत हंगाम २०२२-२३ या दरम्यान पुरवठा करण्यात आलेल्या ऊसाच्या तोडणी आणि वाहतूक शुल्कात कपात केल्यानंतर राज्यभरातील कारखान्यांनी शेतकऱ्यांना २७,५०० कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. गेल्या हंगामात राज्यात एकूण २११ साखर कारखाने सुरू होते. पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयाने अलिकडेच गेल्या हंगामातील देय रक्कमेसह शेतकऱ्यांना अदा केलेल्या योग्य आणि लाभदायी दराची (एफआरपी) आकडेवारी जारी केली आहे.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एकूण २६ कारखान्यांकडून १८२ कोटी रुपये थकीत असल्याचे उपलब्ध आकडेवारीनुसार दिसून येते. आता जिल्हाधिकाऱ्यांना या पैशांची वसुली करण्यास सांगण्यात आले आहे. राज्याचे साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले की, आम्ही १७ साखर कारखान्यांना महसूली वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) जारी केली आहे. ही कारवाई टाळण्यासाठी काही कारखान्यांनी थकीत बिले देण्याची तयारी दर्शवली आहे.