गहू काढणीसाठीही शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती

अहिल्यानगर : सध्या पहिल्या टप्प्यात पेरणी केलेला गहू काढणीला आला आहे. मजूर मिळत नसल्याने नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी हार्वेस्टर मशीनच्या साहाय्याने गहू काढणीस प्राधान्य दिले आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या साहाय्याने गहू काढणीला पसंती देत आहे. यावर्षी गव्हाच्या पेरणी मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतकरी हार्वेस्टरने गहू काढत असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांना अठराशे ते दोन हजार रुपये, तर भुसा साठवणूक करणाऱ्या हार्वेस्टरचा एकरी सहा हजार रुपये काढणी खर्च येत आहे.

गव्हाचा भुसा जनावरांना चारा म्हणून वापरला जातो. त्यामुळे त्याला चांगलीच मागणी आहे. शेतकऱ्यांनी सोंगणी केलेल्या गव्हाला लागलेला खर्च निघायचा. मात्र, आता तो चारा हार्वेस्टरमुळे वाया जात असल्याने शेतकऱ्यांना चारा टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र आता भुसा साठवणूक करणारे हार्वेस्टर आल्यामुळे या हार्वेस्टरला चांगली मागणी आहे. दरम्यान, सध्या गव्हाचे एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन होत आहे. बाजारामध्ये आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बियाणांची पेरणी शेतकऱ्यांनी केली. मात्र उत्पादनामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. नवीन गहू बाजारात येताच भाव झपाट्याने खाली येत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here