मेरठ : भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी रविवारी किनौनी गावातील एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी ते रसूलपूर जाहिद गावाचे सरपंच कुलदीप हुड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्यासमवेत भाकियूचे जिल्हाध्यक्ष अनुराग चौधरी होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले लवकर मिळावीत आणि थकीत बिलाचे पैसे कारखान्यांनी तातडीने द्यावेत यासाठी लवकरच आंदोलनाची घोषाणा केली जाईल, अशी घोषणा टिकैत यांनी केली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हाध्यक्ष चौधरी यांनी टिकैत यांना किनौनी साखर कारखान्याकडून ऊस बिले देण्यास होत असलेल्या उशीराबद्दल आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल माहिती दिली. यावेळी राकेश टिकैत म्हणाले, जर कारखाना लवकरात लवकर ऊस बिले देत नसेल तर मोठे आंदोलन उभारले जाईल. यावेळी हर्ष चहल, विपुल, हर्ष सिसौला, विजित, हरेंद्र, ओमपाल डांगी आदी उपस्थित होते.