थकीत ऊस बिले न मिळाल्याने शेतकऱ्यांची निदर्शने

बागपत : शेतकरी संघटनेच्या बॅनरखाली शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने कली. लवकर बिले न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

लाइव्ह हिंदुस्थानमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चौधरी ब्रजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी तहसील कार्यालयात पोहोचले. शेतकऱ्यांनी ऊस बिले मिळत नसल्याबद्दल जोरदार आंदोलन केले. लोयन मलकपूर साखर कारखान्याने आर्थिक वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन्ही वर्षांचे पैसे दिले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सरकारच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना आपली ऊस बिले मिळवण्यासाठी चकरा माराव्या लागत आहेत. आधीच्या आर्थिक वर्षातील सुमारे २०० कोटी रुपये आणि चालू हंगामातील ४०० कोटी रुपये थकबाकी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सरकारच्या निर्देशानुसार ऊस कारखान्याला दिल्यानंतर १४ दिवसांत पैसे देणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास व्याजासहित पैसे देण्याची तरतुद कायद्यात आहे. मात्र शेतकऱ्यांना एक वर्षापासून पैसे मिळाले न नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. आर्थिक स्थिती खराब झाली आहे. बँकांची कर्जे, वीज बिल, मुलांचे शिक्षण, दैनंदिन संसारासाठी खर्च यासाठी खूप अडचणी आल्या आहेत शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी बलजोर सिंह, विक्रम आर्य, देवेन्द्र सिंह, देशपाल, विनोद आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here