बगहा: वाढत्या महागाईतही सरकारने ऊसाच्या दरात कसलीही वाढ केलेली नाही. यूरिया सह शेतकरी वापर करणाऱ्या सर्व खत आणि कीटकनाशकांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. तसेच पूर आणि पाणी साठल्याने नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देखील मिळत नाही. या सर्व मागण्यांसह सोमवारी शेतकरी संघाने अनुमंडल समक्ष निदर्शने केली. शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसान भरपाई सह आपल्या सात सूत्रीय मागण्यांचे निवेदन एस डीएम यांना दिले. ऊस तोड संघाचे प्रदेश सचिव छोटे श्रीवास्तव यांच्या नेतृत्वामध्ये रामविलास सिंह, संजीव गुप्ता, लाल बाबू यादव ,मदन मोहन दुबे आदि शेतकऱ्यांनी एस डीएम यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या महागाईला लक्षात घेउन ऊसाचे मूल्य साडे चारशे रुपये प्रति क्विंटल असावे. तसेच नुकसान झालेल्या पीकांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. याशिवाय ट्रॅक्टर वर चा व्यवसाय कर परत घेतला जावा. पूर आणि कोविड-19 ला पाहता शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जावे, शेती साठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर वर निबंधन शुल्क घेऊ नये, याशिवाय गेल्या दोन वर्षांपासून चा ऊस बियांवर मिळणारे अनुदान शेतकऱ्यांना द्यावे. शेतकऱ्यांनी सांगितले की, या अनुदानात कोणतीही वृध्दी झालेली नाही. पण ऊस पिकवण्याच्या खर्चात मात्र मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या दिवसात पाऊस तसेच जल साठयामुळे तांदूळ आणि ऊस पीकाचे मोठे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई मिळणे आवश्यक आहे. सरकारकडून त्यांच्या मागणीवर विचार केला गेला नाही तर तिव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शेतकरी नेता अखिलेश कुमार ,साहेब यादव, मंकेश्वर दीक्षित ,राम सुदामा साहनी, सोहन कुमार, चंद्रजीत राय, मदन चौधरी, दिलीप कुमार, मुन्ना यादव मुन्ना खा,सगीर अहमद आदि शेतकरी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.