नजीबाबाद : थकीत ऊस बिले, खराब विद्युत व्यवस्था आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा करुन सहा वर्षे उलटल्यानंतरही नजीबाबाद साखर कारखान्याच्या क्षमता वाढीचे प्रयत्न होत नसल्याच्या निषेधार्थ भारतीय किसान युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भाकियूचे राष्ट्रीय प्रचार मंत्री होशियार सिंह, विभागीय नेते अजय बालियान, बाबूराम तोमर, युवा जिल्हाध्यक्ष सरदार वरिंदर सिंह बाठ, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सिंह, तालुका अध्यक्ष दिनेश कुमार, प्रभाग अध्यक्ष अवनीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी तहसील कार्यालयासमोर पोहोचले. त्यांनी निदर्शने केली. शेतकऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी सहा वर्षांपूर्वी नजीबाबाद साखर कारखान्यात येऊन कारखान्याचा विस्तार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सहा वर्षे उलटल्यानंतरही साखर कारखान्याचे विस्तारीकरण झालेले नाही. ऊसाचा गळीत हंगाम संपून दोन महिने उलटले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना पूर्ण ऊस बिले मिळाली नाहीत. शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अशा विज विभाग त्यांना त्रास देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला आहे.
शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन उप जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी तहसील महासचिव वीरेश राणा, जिल्हा उपाध्यक्ष मदन चौहान, करण सिंह, हुकुम सिंह, रुपेश कुमार, अनुज चौधरी, राजीव राठी, अर्जेंद्र सिंह, जितेंद्र पहलवान, सतपाल सिंह, सौरभ चौहान आदी उपस्थित होते.