पुणे : बारामती कारखान्याच्या ॲग्रो साखर संबंधित कारखान्यातील अधिकारी यांना कारखान्याच्या चिमणीमधून प्रदूषित राख बाहेर येत आहे. ती आजूबाजूला गावात पसरते. त्याचा लोकांच्या आरोग्यावर शेतीवर मोठा परिणाम होत आहे. हे प्रदूषण थांबवत कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित राखेबाबत उपाययोजना करण्याची मागणी पारवडी येथे शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला केली आहे. ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या गेटच्या बाहेर रस्ता रोको आंदोलन केले.
ग्रामस्थांनी सांगितले की, बारामती ॲग्रोमधून बाहेर पडणाऱ्या राखेचा मोठा परिणाम शेतीवर आणि गावावर होत आहे. यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करूनदेखील दखल घेतलेली नाही. याबाबत तानाजी माळशिकारे यांनी सांगितले की, आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. मात्र, आगामी काळात तीव्र आंदोलन केले जाईल. यावेळी रासपचे तालुकाध्यक्ष ॲड. अमोल सातकर, नितीन पवार, विठ्ठल बेंगारे, बाबासाहेब पोंदकुले, शिंदे पोलीस पाटील, अनिल आटोळे, निलेश नगरे, शंकर गायकवाड, नितीन नांगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.