थकीत ऊस बिलप्रश्नी शेतकरी करणार आंदोलन

बागपत : लोयन-मलकपूर गावात बुधवारी किसान युनियनच्यावतीने पंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऊसाची थकबाकी व शेतकऱ्यांच्या इतर समस्यांसाठी किसान युनियनच्यावतीने मोठे आंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष शवित मलिक म्हणाले की, शेतकरी आंदोलनादरम्यान आसपासच्या लोकांनी बरौतमध्ये आंदोलन केले. लोकांनी किसान युनियनच्या बॅनरखाली शेतकऱ्यांसाठी लढा दिला. किसान युनियन त्यांचा आदर करते.
यावेळी उपस्थितांनी ब्रिजपालसिंग लांबदार यांचा किसान रत्न पुरस्कार देऊन गौरव केला. शेतकरी सतवीर तोमर, प्रमोद पुनिया, सोनू सिनौली, उदयवीर चंदनहेरी, सुखपाल सिंह प्रधान, रामचंद्र प्रधान, चंद्र गुराना, धरमपाल नांगल आदींसह सर्व शेतकऱ्यांचे मेहबूब अन्सारी यांनी फेटा बांधून स्वागत केले. जितेंद्र सिंह तोमर यांची बागपत शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
जितेंद्र सिंह तोमर म्हणाले की, शेतकरी आणि मजुरांच्या समस्यांना तोंड देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू. शेतकरी संघटना बळकट करण्यासाठी अथक प्रयत्न केले जातील. पश्चिम उत्तर प्रदेशात सध्या उसाची बिले ही मोठी समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत शेतकरी संघटना लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहे असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here