बलरामपुर : सरकारने भाजीपाला, फुल उत्पादन अशा इतर पिकांच्या शेतीला प्रोत्साहन दिले असले तरी जिल्ह्यात आताही नकदी पिकाच्या रुपात शेतकऱ्यांनी ऊस शेतीवरच विश्वास ठेवला आहे. कमी श्रमामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस शेतीला गेल्या दोन वर्षात लाल सड रोग आणि पुराचा फटका बसला आहे. योग्य बियाण्यांचे निवड न करणे आणि मातीवरील उपचारांकडे दुर्लक्ष यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी ऊस लागवड क्षेत्रात घट होईल अशी शक्यता होती. उसाचे लागवड क्षेत्र पडताळणीसाठी साखर कारखाना व सहकारी समित्यांनी १५४ पथके नियुक्त केली होती. या सदस्यांनी गावोगावी जावून लागवड क्षेत्राची नोंदणी केली. २० जूनपर्यंत सुरू राहिलेल्या ऊस सर्व्हेचा अहवाल नुकताच सादर झाला आहे. या अहवालानुसार ऊसाचे क्षेत्रफळ ९,२०,००० हेक्टरवरुन वाढून ९,३५,००० हेक्टर झाले आहे. अहवालानुसार गेल्या वर्षभरात लागवड क्षेत्रात दीड टक्क्याची वाढ झाली आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस लागवड क्षेत्रातील ही वाढ म्हणजे जिल्ह्यातील साखर कारखान आणि खांडसरी उद्योगासाठी शुभ संकेत मानले जात आहेत. ऊस सर्व्हेचा अंतिम अहवाल आल्यानंतर ऊस विभाग आता त्याच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. २५ जून ते ३१ जून या कालावधीत समित्यांचे कर्मचारी गावागावात जाऊन याची माहिती देतील. जिल्हा ऊस अधिकारी रणजित सिंह कुशवाहा यांनी सांगितले की, २० जूनपर्यंतचा अहवाल सादर झाला आहे. यावर्षी दीड टक्के लागवड क्षेत्र वाढले आहे. आता सर्व्हेचे प्रदर्शन केले जाईल.