विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांची गर्जन रॅली : रामलीला मैदानावर जमली गर्दी

केंद्र सरकारकडून विविध मदत, उपायांची मागणी करत दिल्लीतील वाढत्या थंडी आणि धुक्याच्या पार्श्वभूमीवर, ‘किसान गर्जना’ रॅलीसाठी शेतकरी रामलीला मैदानावर जमू लागले आहेत.

जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर अडचणीचा सामना करावा लागेल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेल्या भारतीय किसान संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. देशभरातील शेतकरी बसेस, ट्रॅक्टर आणि मोटारसायकलने रामलीला मैदानावर आंदोलनस्थळी पोहोचत आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या आधारे योग्य दराची मागणी केली आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सर्व प्रकारच्या कृषी उत्पादनांवरील जीएसटी मागे घेण्याचे आणि जनुकीय सुधारित पिकांच्या व्यावसायिक उत्पादनास परवानगी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पीएम-किसान योजनेंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत वाढवावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केंद्र सरकाकडे केली आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर दबाव वाढवला आहे. डिसेंबर २०१८ मध्ये सुरू केलेल्या योजनेअंतर्गत, तीन समान हप्त्यांमध्ये सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना दर वर्ष ६,००० रुपयांची मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गर्जना रॅलीत सुमारे साठ हजार लोक सहभागी होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here