मुंबई : कृषी क्षेत्राने इतर प्रगती केली असली तरी ती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकरी दुष्काळ, पूर, उष्णतेची लाट, अतिवृष्टी अशा संकटांचा सामना करतो. शेतीमधील धोका पंतप्रधान पीक विमा योजनेतून कमी होऊ शकतो. ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच बनली आहे. या योजनेची गरज शेतकरी समजत आहेत. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ६० हजार शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत.
टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या पिकावर जेव्हा नैसर्गिक संकट येते, तेव्हा त्यांना या योजनेमधून क्लेम मिळेल. त्यांचा शेतीमधील नुकसानीचा धोका खूप कमी होतो. केंद्र सरकराने शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पिक विम्याच्या प्रमियमपैकी १.५ ते २ टक्के हिस्सा शेतकऱ्यांना द्यावा लागतो. इतर हिस्सा राज्य व केंद्र सरकारकडून दिला जातो. महाराष्ट्रात दरवर्षी शेतीवर नैसर्गिक संकटे आहेत. आताही हजारो हेक्टरमधील पिके पावसाने खराब झाली आहेत. नांदेड जिल्ह्यात खरीपाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस व इतर पिके घेतली जातात. येथील शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. राज्यात ३९ लाख २१ हजार शेतकऱ्यांनी पिक विम्यासाठी नोंदणी केली आहे.