ऊस तोडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ, उशिरा गाळपामुळे वजनात घट

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील तिन्ही साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम तब्बल एक महिना उशिरा सुरू झाला. परिणामी ऊसाचे वजन घटले आहे. अजूनही तालुक्यात निम्म्याहून अधिक ऊस शिवारात उभा आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

चंदगड तालुक्यातील तालुक्यातील अथर्व (दौलत), ओलम (हेमरस) आणि इकोकेन म्हाळुंगे या तीन साखर कारखान्यांबरोबरच गडहिंग्लज, संकेश्वर, सतीश शुगर्स, हल्ल्याळ, एम. के. हुबळी या कारखान्यांनी चंदगड तालुक्यातील काही प्रमाणात ऊस पळवण्यास सुरुवात केली आहे. अनेक छोट्या शेतकऱ्यांना अद्याप ऊसतोड मिळाली नसल्याने अडचण झाली आहे. अनेकांना विनवणी केल्याशिवाय पर्याय राहिला नसून कमी क्षेत्रातील शेतकऱ्यांना ऊसतोडीची प्रतीक्षाच असून, आपला ऊस कधी जाणार, याकडे डोळे लावून बसलेल्या ऊस उत्पादकांना दररोज कारखान्याच्या कार्यालयाचा उंबरा झिजवावा लागत आहे. तालुक्यात उसाच्या वजनातही कमालीची घट झाली आहे. ५० टनांहून अधिक ऊस असणाऱ्या शेतकऱ्यांनी तो इतरत्र पाठवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here