कोल्हापूर : राहुरी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले शास्त्रीय गूळ निर्मिती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे. हे तंत्रज्ञान वापरुन बनवलेल्या गूळ व काकवीला बाजारपेठ उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोककुमार पिसाळ यांनी केले. कोल्हापुरात शास्त्रोक्त पद्धतीने गूळ निर्मिती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबिर झाले.
डॉ. विद्यासागर गेडाम, डॉ. कल्याण बाबर यांनी गूळ निर्मितीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणे यांची गुळाचे रासायनिक तसेच गूळ, काकवी, ओळख, पृथ्थकरण पावडर निर्मितीची माहिती दिली. महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उपमहाव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी गुळाची भौगोलिक मानांकन व्यवस्था आणि निर्यातीसंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. गोविंद येणग, डॉ. सिद्धार्थ लोखंडे, डॉ. अभिजित गाताडे, प्रतिभा पावडे, वसंत सुतार आदी उपस्थित होते.