शेतकऱ्यांनी साखरेच्या दरवाढीसाठीही संघर्ष करावा : चेअरमन गणेश माने

सोलापूर : शेतकऱ्यांनी साखरेचे दर वाढवून मिळण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने यांनी केले. मांडले. आचेगाव येथील जयहिंद शुगरकडून १४ ते ३१ जानेवारीपर्यंतच्या उसाचे प्रती टन २७०० रुपयांप्रमाणे बिल शेतकऱ्यांना चेअरमन माने देशमुख यांच्या हस्ते चेकचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच अर्जुन आगावणे होते.

चेअरमन गणेश माने म्हणाले की, बांगलादेश, श्रीलंका व नेपाळ देशात साखरेचे भाव प्रतिकिलो १०० रुपयांपेक्षा जास्त आहेत. देशात साखरेचे भाव फक्त ५० रुपये प्रतिकिलो मिळाल्यास शेतकऱ्यांना प्रती टन उसाला ४००० रुपये दर देण्यात कारखानदारांना कसलीच अडचण नाही. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते अंबणप्पा भंगे, कुमारप्पा पाटील, रमेश ग्रामकर, महादेव वाले, कार्यकारी अधिकारी आर. पी. देशमुख, शेतकी अधिकारी राजेंद्र जेऊरे, बसवराज सराटे, सोमनाथ रामपुरे आदी उपस्थित होते. सलीम पटेल यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here