सांगली : राजारामबापू साखर कारखाना प्रशासनाने ऊसतोड आणि वाहतुकीचे काटेकोर नियोजन केले आहे. यावर्षी ऊस तोडणीमध्ये फारशा तक्रारी राहणार नाहीत. तरीही काही अडचणी आल्या, तर माझ्याशी थेट संपर्क करावा, मी स्वतः लक्ष घालून त्या अडचणी सोडवेन, असा विश्वास राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.
वाळवा तालुक्यातील बिचूद, दुधारी, ताकारी या गावांतील संपर्क 3 दौऱ्यात ते बोलत होते. मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी, यावर्षी किती वाढीव यंत्रणा दिली आहे, याची माहिती दिली. तसेच ऊस विकास अधिकारी सुजय पाटील यांनी विविध योजनांची माहिती दिली.