शेतकर्‍यांनी आपल्या समोर ऊसाचा सर्वे करुन घ्यावा

बिजनौर : ऊस  विभाग आणि साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या शेतातील ऊस  सर्वे सुरु केला आहे. शेतकर्‍यांनी स्वत: शेतात उपस्थित राहून सर्वे करुन घेतला नाहीतर येणार्‍या हंगामात त्यांना संशोधन करण्यामध्ये अनेक अडचणी येतील. बुधवारी उप ऊस आयुक्त अमर सिंह यांनी ऊस सर्वेचे निरिक्षक केले.

यावर्षी ऊस गाळप हंगामात साखर कारखान्यांमध्ये ऊस घालण्यामध्ये शेतकर्‍यांना अडचणी आल्या. ऊसाच्या  अत्याधुनिक लावगडीमुळे पुढचा हंगाम अधिक कठीण होईल असे साींगतले जात आहे. साखर कारखाने आणि ऊस विभागाने ऊसाचा सर्वे सुरु केला आहे. सर्वे च्या आधी शेतकर्‍यांजवळ उक्त क्षेत्राचे सर्वेयर नंबर एसएमएस च्या माध्यमातून पाठवले जात आहे. शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये उपस्थित राहून पेंडी आणि रोपांचे सर्वे करुन घ्यावे. सर्वेनंतर शेतकर्‍यांना त्याच जागी एक पावती दिली जाईल. जर शेतकर्‍यांना हंगाम सुरु होण्यापूर्वी संशोधन करायचे असेल तर त्या पावतीच्या आधारावर ते हाईल. शेतकर्‍यांकडून शेतावरच घोषणापत्र भरुन घेतले जाईल. बुधवारी उप ऊस आयुक्त अमरसिंह आणि जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी स्योहारा कारखाना क्षेत्रातील गाव पूरनपूर नंगला मध्ये सर्वे कार्याचे निरिक्षण केले. जिल्हा ऊस अधिकारी यांचे म्हणणे आहे की, शेतकर्‍यांनी सर्वे करण्यामध्ये हालगर्जीपणा करु नये. शेतकर्‍यांनी सर्वे करताना स्वत: शेतावर उपस्थित रहावे आणि सर्वेयर ला आपल्या शेताची योग्य माहिती द्यावी.

नगीना द्वारीकेश साखर कारखाना बुंदकी क्षेत्रामध्ये चालू असणार्‍या ऊस सर्वेक्षणाच्या कार्याचे एससीडीआई अविनाश चंद्र तिवारी यांनी निरिक्षण केले. त्यांनी प्रशिक्षणानंतर ही ऊस सर्वेक्षणात दक्षता न घेणार्‍या समितीच्या अर्धा डझन लोकांना ऊस सर्वेक्षणाच्या कार्यातून काढून टाकले. ऊस विभागाकडून केल्या जाणार्‍या ऊस सर्वेक्षणात ऊस समिती लिपिक आणि कारखाना कर्मचारी आणि ऊस पर्यवेक्षक सहभागी आहेत. ऊस सर्वेक्षण बुंदकी कारखान्याकडून उपलब्ध करण्यात आलेल्या एचएचसी मशिनच्या माध्यमातून केले जात आहे. हे मशीन इंटरनेट व जीपीएस च्या माध्यमातून ऑनलाइन ऊस विभाग कार्यालयाशी संलग्न आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here